- २५ ते ३० हजार समाजबांधवांचा सहभाग; निगडी तहसीलदारांना निवेदन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण महाराष्ट्रात तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात २५ ते ३० हजार समाजबांधव सहभागी झाले. चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. पाच तासांच्या प्रवासानंतर सायंकाळी ५ वाजता निगडी तहसील कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली.
शिष्टमंडळाने तहसीलदार जयकुमार देशमुख यांना निवेदन देत सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४च्या निर्णयानुसार उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. मातंग, मादीगा, वाल्मिकी, ढोर यांसह विविध समाजबांधव सहभागी झाले.
मोर्चास आमदार सुनीलजी कांबळे, माजी मंत्री दिलीपजी कांबळे, माजी आमदार सुधाकरजी भालेराव, नगरसेविका अनुराधाताई गोरखे, नगरसेवक बापू घोलप, नेताजी शिंदे, मारुती जाधव, सचिनजी साठे, विष्णूजी कसबे, संजयजी ठोकळ, राजेशजी घोडे, अजिंक्यजी चांदणे, सुकुमारजी कांबळे, गणपतजी भिसे, रेखा बहरवाल, रावसाहेब डोंगरे, मारुती आण्णा पंदरी, राजेशजी बडगुजर, मारुती वाडेकर व अॅड. राम चव्हाण आदी उपस्थित होते.
मोर्चाच्या यशस्वितेसाठी संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब आडागळे, अॅड. सुशील मंचरकर, गणेश लोंढे, गणेश अवघडे, भारत विटकर, राजेश आरसुळ, महेश खिलारे, मयूर जाधव, संदीप जाधव, चंद्रकांत लोंढे, अविनाश शिंदे, बाबासाहेब रसाळ, बाबासाहेब पाटोळे, अरुण जोगदंड, संजय ससाने, नितीन घोलप, सुनील भिसे, विनायक मोहीते, सुरज कांबळे, आशाताई बापू वाघमारे, कृष्णा साबळे, शहाणे भानुदास नेटके, भगवान शिंदे, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, शिवाजी साळवे, सतीश भवाळ, अविनाश लोणारी, संजय एडके, राजू आवळे, विठ्ठल झिंजुर्डे, नाना कांबळे, भाऊ कसबे, मारुती सोनटक्के, सागर कापसे, प्रसाद केसरे, स्वप्नील वाघमारे, मयूर घोलप, शंकर खवळे, ऋषी वाघमारे, शिवाजी खडसे, महादेव आडागळे, योगेश लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

















