न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप हे रजेवर असल्याने त्यांच्या पदाशी संबंधित अतिरिक्त कामकाज इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे.
प्रशासकीय कामकाज सुरळीत राहावे, यासाठी उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे नगरसचिव पदाचे अतिरिक्त कामकाज सोपविण्यात आले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या विभागाचे कामकाज सांभाळून, मुकेश कोळप रुजू होईपर्यंत ते नगरसचिव पदाचे अतिरिक्त कामकाज पाहणार आहेत.
तसेच, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी पदाचे अतिरिक्त कामकाज संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. श्री. कोळप रुजू होईपर्यंत संबंधित अधिकारी हे कामकाज पाहणार आहेत. महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत व प्रभावीपणे सुरू राहावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी १४ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात आली आहे.

















