न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२६) :- कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था, पुणे यांच्या वतीने वल्लभनगर आगार, पिंपरी-चिंचवड येथे गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांसाठी जादा एस.टी. बसगाड्या सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच खेड मधील वडगाव मार्गावरील बससेवा सुरू करावी व चोरवणे मार्गासाठी विशेष जादा बसगाड्या सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. संतोष कदम, सचिव श्री. नंदकुमार महाडिक, कार्याध्यक्ष श्री. अंकुश चव्हाण, मार्गदर्शक श्री. गजानन भाऊ मोरे, उद्योजक श्री. ज्ञानेश्वर कदम, माजी अध्यक्ष श्री. संदीप साळुंखे, श्री. रुपेश मोरे, श्री. सुरज उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आगार प्रमुखांनी वरिष्ठांशी चर्चा करून जादा बसगाड्यांबाबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

















