न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ सप्टेंबर २०२६) :- स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान (क्रांती चौक, राजमाता जिजाऊ नगर, प्रभाग क्रमांक ११ व १३, चिखली प्राधिकरण) आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त इयत्ता दहावी व बारावीच्या २०२६ परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी संदेश मुखेडकर (डायरेक्टर, स्टेप्स अकॅडेमी) व राकेश गोवाडिया यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, विद्यमान नगरसेवक तुषार सहाने, डॉ. सुहास कांबळे, नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, शिवराज लांडगे उपस्थित होते. प्रभागातील विविध सोसायट्यांच्या चेअरमन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोद अहिरे, अध्यक्ष युवराज शेळके, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत येवले, सचिव संदीप सूर्यवंशी, खजिनदार संदीप कुंभार, चेतन समदाणी, दादाजी रायते, राजकुमार उदाबाळे, निखिल चिताम यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल शिनलकर यांनी केले.


















