- सोमवारी यादी सादर करताच वरिष्ठ नेतृत्वाकडून मंगळवारी नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब…!
- शहराध्यक्ष चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मिळणार नवी संजीवनी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 22 सप्टेंबर 2026) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आलेल्या पत्रकातून या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली.
यामध्ये भोसरी विधानसभा प्रमुखपदी अनिल पाराजी सोमवंशी, पिंपरी विधानसभा प्रमुखपदी तुषार अंतराव नवले, भोसरी विधानसभा संघटकपदी अमोल तुकाराम भालेकर, चिंचवड विधानसभा संघटकपदी सिद्धिक इस्माईल शेख, चिंचवड विधानसभा समन्वयकपदी श्रीमंत गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहर समन्वयकपदी कैलास पंढरीनाथ नेवासकर आणि शहर प्रवक्तेपदी रावसाहेब चंद्रकांत थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील संघटनात्मक कामकाजासाठी दिलीप ज्ञानदेव सावंत, दिलीप रामचंद्र दंडवते, नितीन गुलाबराव घोलप, गणेश विजय आहेर, पार्थरमेश गुरव, किरण ज्ञानेश्वर दळवी, पांडुरंग दिनकर पाटील, लक्ष्मण वामनराव तपकीर, विकास अण्णासाहेब एकशिंगे, गणेश श्रीमंत पाडुळे, सतीश जगदीश मरळ, सुमित रमेश निकाळजे, रावसाहेब माणिक डोंगरे आणि नितीन बोंडे यांची उपशहरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी (दि. २१) शहरप्रमुख चेतन पवार यांनी मुंबई येथे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे नव्या कार्यकारिणीसाठी निवडलेल्या सक्रिय व इच्छुक कार्यकर्त्यांची यादी सादर केली होती. जूनमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या प्रभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या होत्या. संघटनात्मक क्षमता, पक्षातील सक्रिय सहभाग, सामाजिक काम आणि पक्षाच्या कार्यक्रमांमधील सहभाग या बाबींचा विचार करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते.
सोमवारी यादी वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर झाल्याने शहरातील संघटनात्मक बांधणीला पुढील दिशा मिळाली आहे.

















