न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना कुत्री पाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, अशा कुत्र्यांचे लसीकरण व योग्य निगा राखली जात नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विनापरवाना कुत्री पाळणाऱ्यांसह परवाना असूनही निष्काळजीपणा करणाऱ्या नागरिकांवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
शहरात केवळ सुमारे ४०० नागरिकांनी महापालिकेचा रितसर परवाना घेऊन कुत्री पाळली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सुमारे ७० ते ७५ हजार नागरिक विनापरवाना कुत्री पाळत असल्याची माहिती मिळत आहे. योग्य लसीकरण व निगा न राखल्याने कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे रेबीजचा धोका निर्माण होतो.
झोपडपट्टी, चाळी, घरकुल, पुनर्वसन इमारती तसेच रस्त्यालगतची दुकाने, गॅरेज आणि हॉटेल परिसरात कुत्र्यांना मोकळे सोडले जात असल्याने नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती, लहान मुले तसेच दुचाकीस्वारांना धोका निर्माण होत आहे. कुत्र्यांच्या झुंडीमुळे अपघात होऊन जीवितहानीही होत आहे.
“शहरात कुत्री पाळण्याबाबतचे नियम कागदावर न राहता त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. विनापरवाना कुत्री पाळणाऱ्यांसह निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यासच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागेल. विनापरवाने कुत्री पाळणा-यांवर व परवाना असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावा. अन्यथा न्यायालयात दाद मागितली जाईल,”
– गणेश जगताप, संकल्प युवा फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष…

















