न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या युरॉलॉजी विभागाच्यावतीने (दि. २२ आणि २३) रोजी “युरॊलॉप पुणे बेसिक्स टू रोबोटिक्स वर्कशॉप” चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत मूत्रविकार उपचारासाठी आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच वापराबाबत विविध राष्ट्रीय पातळीवरील प्रख्यात तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लॅप्रोस्कॉपीक व रोबोटिक या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूत्रविकारातील विविध १८ प्रकारच्या शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपणाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली.















