न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी ३३४ व्या पालखी सोहळ्यासाठी झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी देहूगाव ग्रामपंचायत कार्यालयात अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांनी प्रशासनाच्या विविध विभागातील कामांच्या तयारीची माहिती घेतली. उर्वरित कामांचाही आढावा घेत संबधितांना सूचना केल्या.
मुख्यत्वे ड्रेनजच्या कामांमुळे रस्त्याचे रखडलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. पालखी सोहळा सोमवारी (दि. २४) रोजी प्रस्थान ठेवणार असून मंगळवारी (दि. २५) रोजी देहूतील पहिला मुक्काम घेत पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. सोहल्यातील भाविक, वारक-याच्या सोयी-सुविधा व सरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार गीता गायकवाड़ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
पीएमपीच्या ३४ बसेस पुणे स्टेशन, मनपा भवन, स्वारगेट, आळंदी, निगडी येथून सोडण्यात येणार आहेत. त्याचे थांबे तळवडे शीव चौकात, जकात नाक्याच्याजवळ असणार आहेत. याच ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसही राहतील. ३० एसटी बसेस उपलब्ध असणार आहेत. पाण्याचा टॅक्टरही असणार आहे. सर्व विभागांनी आप-आपली कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.















