न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ सप्टेंबर २०२६) :- भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या कार्यकाळात शहरातील विविध भागांतील असंख्य युवक भारतीय जनता युवा मोर्चाशी जोडले जात आहेत. युवकांच्या वाढत्या सहभागातून संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळत आहे.
याच अनुषंगाने उमाकांत लिंगाडे, श्रीधर महाले आणि प्रज्वल खुटाळ यांच्या समवेत असंख्य युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चात जाहीर प्रवेश केला. युवकांनी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य, जनसेवा तसेच युवकांशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. युवकांच्या प्रश्नांना वाव देत त्यांना सामाजिक कार्याच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यावर भर दिला जात आहे.
या प्रसंगी युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव तथा प्रभारी अजित कुलथे, सरचिटणीस राहुल खाडे, सुमित घाटे, सम्यक साबळे, राजेश डोंगरे, उपाध्यक्ष मयूर काळभोर, अतुल काळोखे, सचिव गोपाल मंडल, निखिल शहाणे, जालिंदर काटे, रोहित कराळे, शिवाजी कारगुडे, मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेकर, आकाश पवार, विद्यार्थी विभाग शहर सहसंयोजक साईराज भालेकर, रोजगार व स्वयंरोजगार शहर संयोजक नितीन साळी, रोजगार व स्वयंरोजगार शहर महिला संयोजिका योगिता जाधव, उद्योग आघाडी शहर संयोजक आदित्य कुलकर्णी, सहसंयोजक दीपराज गुप्ता यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांचा हा सहभाग भारतीय जनता युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक बनवणारा असून, आगामी काळातही शहरातील युवकांना मोठ्या संख्येने संघटनेशी जोडून सामाजिक व जनहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

















