- दिवेआगर दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली..
- पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ ऑक्टोंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची १२२ वी जयंती खराळवाडी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या उपस्थितीत दोन्ही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
योगेश बहल यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता व सर्वधर्मसमभावाच्या विचारांचे स्मरण केले. लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व ‘जय जवान, जय किसान’ या विचारांचा उल्लेख केला. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही मनोगत व्यक्त केले.
दिवेआगर दुर्घटनेतील आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सीमा सावळे, फझल शेख, शेखर चिंचवडे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, ज्ञानेश्वर कांबळे, रवींद्र ओवाळ, माऊली मोरे, विष्णू शेळके, अकबर मुल्ला, संपत पाचुंदकर, बाळासाहेब पिल्लेवार, राजेंद्र पवार, रमजान सय्यद, प्रवीण पिंजन, प्रदीप गायकवाड, मनीष शेंडगे, राजू लोणके, धनाजी तांबे, सुनील अडागळे आदी उपस्थित होते.


















