- नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते उद्घाटन..
- ओला कचरा प्रक्रियेसह टप्प्याटप्प्याने सुका, पुनर्वापरयोग्य व ई-कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०४ ऑक्टोंबर २०२६) :- वाकड येथील कोस्टा रिका को-ऑपरेटिव्ह सोसायटीने पर्यावरण संवर्धनासाठी ‘झिरो वेस्ट इनिशिएटिव्ह’ उपक्रमाला सुरुवात केली. नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाले. Mothers Companyच्या CSR अंतर्गत SORT Programच्या माध्यमातून या उपक्रमाला सहकार्य मिळणार आहे.
प्रारंभी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एरो बिन्स, स्टँड, कोकोपीट व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. कचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
उपक्रमासाठी ११ सदस्यांची ‘झिरो वेस्ट कमिटी’ स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती, घराघरांत मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाचे निरीक्षण समितीमार्फत केले जाणार आहे. पुढील टप्प्यात प्लास्टिक, पुनर्वापरयोग्य साहित्य आणि ई-कचऱ्याचे स्वतंत्र व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

















