याप्रसंगी बोलताना संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी नाना पाटेकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. नाना पाटेकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू लोकांना मदत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते. या सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने नाम फाउंडेशनला २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयाचा ठसा उमटवला. ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘प्रहार’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. रंगभूमीपासून सुरू झालेल्या त्यांच्या कलाप्रवासासोबतच सामाजिक कार्यातील योगदानामुळेही ते आदराचे स्थान मिळवू शकले. समाजाप्रती संवेदनशीलता, गरजूंना मदत करण्याची भावना आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. इयत्ता युकेजी मधील अरिका पवार या विद्यार्थिनीने नाना पाटेकर यांचा नटसम्राट हया चित्रपटातील अभिनय करून दाखवला.


















