- अल्प मुदतीच्या सूचनेवर आक्षेप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ९ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांसोबत काम करू इच्छिणाऱ्या संस्थांच्या प्रकल्प सादरीकरण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ६ ऑक्टोबर रोजी आयोजित सादरीकरणाबाबतचे पत्र ५ ऑक्टोबरला WhatsApp ग्रुपवर शेअर करण्यात आले. काही संस्थांना अवघ्या एका दिवसाच्या आत सादरीकरणासाठी बोलावण्यात आल्याचा आक्षेप ज्ञानसंगम फाउंडेशनचे आदिनाथ जावीर यांनी घेतला आहे.
शिक्षणाधिकारी उपस्थित राहू शकणार नसल्याने नियोजित सभा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणी जावीर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी हरकत नोंदवली आहे.
पत्र कोणत्या संस्थांना पाठविण्यात आले, सूचना देण्याची पद्धत अधिकृत होती का, तसेच निवडणूक आचारसंहितेच्या काळात सभा घेण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली होती का, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुढील सादरीकरणासाठी निवड निकष जाहीर करून किमान सात दिवसांची लेखी सूचना द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

















