न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ ऑक्टोबर २०२६) :- मराठी उद्योजकांना व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’चे आयोजन १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. एक हजारांहून अधिक स्टॉल्स आणि ५० पेक्षा जास्त व्यावसायिक क्षेत्रांचा सहभाग असणार आहे.
मराठा उद्योजक विकास व मार्गदर्शन संस्थेतर्फे आयोजित या प्रदर्शनाची माहिती संजय वायाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अर्जुन खामकर, रमेश पवार, आबासाहेब ढवळे, गणेश जाधव, डॉ. जयसिंग कदम, विकास नाणेकर, गणेश औताडे, पल्लवी बोरडे आणि सोनाली भोसले उपस्थित होते.
एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, प्रतापराव जाधव, राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत आणि हणमंतराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती अपेक्षित आहे. उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


















