न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत. मात्र, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ही दोन्ही तैलचित्रे सध्या लाल कापडाने झाकण्यात आली आहेत.
महापालिका भवनाच्या दर्शनी भागात दोन्ही नेत्यांची तैलचित्रे लावण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्यानुसार महापालिकेच्या स्थापत्य विभागाने तैलचित्रे बसविण्याचे काम पूर्ण केले आहे. तळमजल्यावर कर संकलन विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर अजित पवार यांचे, तर जिन्याच्या शेजारी लक्ष्मण जगताप यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.
दोन्ही तैलचित्रे चित्रकार सुनील शेगावकर यांनी रेखाटली आहेत. ठरावानुसार तैलचित्रे लावण्यात आली असली, तरी निवडणूक आचारसंहितेमुळे त्यांचे औपचारिक अनावरण करण्यात आलेले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर तैलचित्रांचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापालिका भवनातील या तैलचित्रांचे अनावरण आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहे.
















![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/images-1-2-190x122.jpeg)

