न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- आरोपींनी त्यांची (एमएच १२ केटी ९१६०) ही व्हेंटो कार विकायची असल्याची जाहिरात ओएलएक्स वर दिली. ही जाहिरात पाहून संतोषकुमार यांनी आरोपींशी संपर्क केला. आरोपी प्रशांत याने त्याच्या बँक खात्यावर ऑनलाइन माध्यमातून पैसे भरण्यास सांगितले.
तसेच आरोपीच्या एका साथीदाराने संतोषकुमार यांना भेटून त्यांची कागदपत्रे आणि रोख रक्कम घेतली. संतोषकुमार यांनी आरोपींना एकूण १ लाख ८२ हजार १०० रुपये दिले. आरोपींनी पैसे घेऊन देखील कार न देता फसवणूक केली.
हा प्रकार कोरेगाव पार्क, नांदेड सिटी सिंहगड रोड येथे व काळेवाडी फाटा रहाटणी येथे २३ मे ते २३ जून या कालावधीत घडला. संतोषकुमार जनार्दन प्रसाद (वय ३२, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रशांत एस (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.















