न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पीडित तरुणी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी आली. लेबर रूम वॉर्ड नंबर ५८ मध्ये असलेल्या हर्षल याने तपासण्याच्या बहाण्याने तरुणीशी अश्लील चाळे केले.
‘तुम्हाला बरे वाटू अगर न वाटू तुम्हाला चार दिवस ऍडमिट राहावे लागेल. मी तुम्हाला चहा नाष्टा आणून देऊ का?’ असे म्हणून त्याने तरुणीचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. २३) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पिंपरी येथे घडली.
हर्षल बसवराज निबान्नवर (वय २८, रा. पिंपरी, मूळ रा. धारवाड, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















