न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०१९) :- पोलिसांना एकजण पिंपरीतील भाटनगर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ढोले यास अटक केली.
त्यांच्या जवळील पिशवीमध्ये पोलिसांना ३७ हजार रुपये किमतीचा २ किलो ४५० ग्रॅम गांजा मिळून आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. २३) रोजी रात्री सव्वाअकाराच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली.
सतीश करणसिंग ढोले (वय ४०, रा. वडगावशेरी, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. सर्व गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















