- कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा केबिन भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
फुगेवाडी (दि. १३ नोव्हेंबर २०२६) :- फुगेवाडी येथील स्मशानभूमीत अहोरात्र सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी श्री. निलेश एकनाथ हाके यांनी सुरक्षा केबिन भेट दिली. या केबिनचे उद्घाटन निलेश हाके यांचे वडील एकनाथ हाके आणि शिवाजी बोधले यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा मिळाव्यात, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन विनोद शिंदे, भरत हुलावळे आणि उल्हास तात्या जाधव यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

















