- जलसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. १३ नोव्हेंबर २०२६) :- इंद्रायणी नदी स्वच्छता व संवर्धनाचा संदेश देणारी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी मोशी येथे आयोजित करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून होणारी ही रॅली सकाळी ६ वाजता PIECC मैदानातून सुरू होणार आहे.
२०२३ मध्ये सायकलींची सर्वांत लांब रांग उभारून या उपक्रमाने गिनीज विश्वविक्रमाची नोंद केली होती. यंदा ५ आणि २५ किलोमीटरचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. सहभागी सायकलपटूंना टी-शर्ट, पदक आणि अल्पोपाहार देण्यात येणार आहे.
नोंदणी पूर्णपणे मोफत असून इच्छुकांनी https://maheshklandge.com/rivercyclothon/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२२६ ८५४८७.
“२०२३ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या सायक्लोथॉनची गिनीज विश्वविक्रमात नोंद झाली. त्या लोकसहभागाच्या बळावर यंदा पाणी बचतीचा संदेश अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार ५ किंवा २५ किलोमीटरचे अंतर निवडा, मोफत नोंदणी करा आणि २९ नोव्हेंबरला मोशीमध्ये इंद्रायणीसाठी सायकल चालवूया.”
महेश लांडगे, भाजपा, पिंपरी-चिंचवड…“इंद्रायणीच्या संवर्धनासाठी वर्षभर नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. घरात पाणी जपून वापरणे आणि नदीत कचरा जाणार नाही याची काळजी घेणे, या गोष्टी प्रत्येक जण आजपासून करू शकतो. सायक्लोथॉनमधून हा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत आणि परिसरापर्यंत नेऊया.”
डॉ. निलेश लोंढे, प्रमुख, अविरत श्रमदान.


















