- विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १३ नोव्हेंबर २०२६) :- ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या प्रस्तावित चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द वगळून चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे.
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा गौरवशाली वारसा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित विषयाला महाराष्ट्राचे नाव जोडणे राज्याच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्यास विरोध नसून कलात्मक स्वातंत्र्याचा आदर राखत महाराष्ट्राच्या अस्मितेचाही सन्मान केला पाहिजे. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.

















