- कच्चा माल आणि तयार साहित्य जळून खाक..
- अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग पसरण्यापासून रोखण्यात यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील म्हेत्रेवस्ती येथील चिंचेचा मळा परिसरात असलेल्या प्लास्टिक उत्पादन कंपनीला शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
कंपनीमध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि तयार साहित्य साठवण्यात आले होते. त्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीचे मोठमोठे धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या दुर्घटनेत कंपनीतील कच्चा माल आणि तयार साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग लगतच्या परिसरातील इतर कंपन्या आणि मालमत्तांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

















