- काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर कारवाई…
- वाहनांवरील नियमबाह्य काळ्या काचा आणि आकर्षक फॅन्सी नंबर प्लेट पोलिसांच्या रडारवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहनांच्या काचांना लावलेल्या नियमबाह्य काळ्या फिल्म तसेच नियमांचे उल्लंघन करून बसवलेल्या फॅन्सी नंबर प्लेट पोलिसांच्या निशाण्यावर आल्या आहेत.
वाहनांच्या काचांवरील काळ्या फिल्ममुळे वाहनातील व्यक्तींची ओळख पटवणे कठीण होते. तसेच फॅन्सी नंबर प्लेटमुळे वाहनांचे क्रमांक स्पष्टपणे वाचता येत नाहीत. त्यामुळे अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
शहरातील वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहनांवरील नियमबाह्य काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट काढून टाकाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

















