- जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रथाचे केले सारथ्य
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- जगतगुरू संत तुकाराम महाराज स्वागत पालखी सोहळा ट्रस्ट (रजि), असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट (रजि.) पुणे आणि महाराष्ट्र मजदुर संघटना (माथाडी कामगार) यांच्या संयुक्त विद्यामानाने उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील सेक्टर नं. २३, भक्ती शक्ती चौक ट्रान्सपोर्टनगर येथे आज मंगळवार (दि. २५) रोजी दिंडी प्रमुखांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी वारकऱ्यांना ४५० टाळ, १२ टन बुंदीचा प्रसाद, तसेच फराळ वाटप व आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. हजारो वैष्णवांनी या प्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा स्वागत समिति ट्रस्टचे अध्यक्ष व कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी केले जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रथाचे सारथ्य केले. तसेच शहरावर व राज्यात वरुणराजाची कृपादृष्टी व्हावी, यासाठी देहुश्वराकडे विठ्ठलाला दयेचा पाझर फोडण्यासाठी संत तुकारामांच्या चरणी लीन होत, विठ्ठलाला साकडे घातले. संत महात्म्यांचे विठ्ठल लवकर ऐकतो. आज पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. त्यावर आनंदाची फुंकर हवी असल्यास वरूनराजाची साथ हवी, असे इरफानभाई सय्यद म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शिरुर लोकसभा महिला संघटिका सुलभा उबाळे, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहरजी भिसे, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेना गटनेता राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, सुजाता पलांडे, पुर्णिमा सोनवणे, सचिन चिखले, शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, ट्रांसपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमितजी धुमाळ, कार्याध्यक्ष प्रमोद भावसार, उपाध्यक्ष अशोक काळे, युवा नेते किसन बावकर, दलवीर सिंघ, रोहतास चौधरी, महेंद्र गर्ग, तायल साहेब, राजेन्द्र मालू, संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा स्वागत समिति ट्रस्ट चे कार्याध्यक्ष भिवाजी वाटेकर, उपाध्यक्ष पांडुरंग कदम, खंडू गवळी, न्यानोबा मुजुमले, मुरलीधर कदम, सचिव सर्जेराव कचरे, खजिनदार गोरक्षनाथ बांगर, सतीश कंठाले, सुनील सावले, बबन काळे, न्यानेश्वर पाचपुते, गुलाब शिंदे, शंकर मदने, गोरक्ष दुबाले, अशोक साळुंके, आबा मांढरे, समीर गुजर, राजू तापकिर, उपशहरप्रमुख युवराज कोकाटे, आशा भालेकर, स्मिता जगदाळे, पंचायत समिती सदस्या ज्योती आरगडे, सुखदेव नरळे, सचिन सानप, रूपेश कदम, अमित शिंदे, दिलीप सावंत, कैलास नेवास्कर, शरद हुले, भाऊ काटे, दिलीप दंडवते, रुपाली आल्हाट, रमेश मिलिंदकर, नामदेव भोसले, भास्कर बोरुडे, वेदश्री काळे, बाबू खराबे, भाजपच्या नीता परदेशी, उज्ज्वला सावंत, माउली वाळके, विधानसभा मतदार संघातील सर्व विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख-उपशाखा प्रमुख, महिला सेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच माथाडी कामगारांनी आणि असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट पुणे च्या सर्व सदस्यांनी कष्टक-यांच्या पालखी सोहळा स्वागत कक्षात उपस्थिती दर्शवून, लाखो वैष्णवांची सेवा करण्याचा लाभ घेतला.















