- पालखीचे महापालिकेने केले मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अॅड.गौतम चाबुकस्वार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते भक्ती शक्ती चौक, निगडी येथे करण्यात आले.

यावेळी शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, नगरसदस्या साधना मळेकर, सुजाता पालांडे, आशा धायगुडे-शेडगे, माई ढोरे, अनुराधा गोरखे, अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे, स्वीनल म्हेत्रे, निता पाडाळे, संगीता ताम्हाणे, कमल घोलप, नगरसदस्य प्रा. उत्तम केंदळे, विक्रांत लांडे प्रविण भालेकर, पंकज भालेकर, अमित गावडे, मोरेश्वर भोंडवे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, जावेद
शेख, राजू मिसाळ, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, राजेंद्र राजापुरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, श्रीकांत सवणे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.















