न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदानाचे वाटप महानगरपालिका मुख्यकार्यालयासमोर उद्या मंगळवार (दि. २५) रोजी सकाळी ०५.०० ते ०७.०० यावेळेत करण्यात येणार आहे.
अन्नप्रसाद वाटपाचा लाभ घेण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी ०५.०० ते ०७.०० यावेळेत आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी केले आहे.















