न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहराला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीतील शहर भाजप कार्यालयात मंगळवारी (दि. २५) रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी राज्यात येत्या १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल. तसेच १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील, असे भाकीत केले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पीसीएनटीडीचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहेत. त्यामळे युतीच्या विधानसभेत २२० जागा निवडून येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अब की बार, २२० पार या घोषणेचा पुनरूच्चार यांनी केला.
यावेळी पाटील यांनी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत २२८ मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य युतीने ठेवले आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे















