न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- निगडी येथील द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्स ऑफ इंडिया (आयसीआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने “साथ चल” उपक्रमा अंतर्गत ९०० पेक्षा जास्त सभासद व विद्यार्थ्यांनी “आई- वडिलांचा आजन्म सांभाळ करेल” अशी प्रतिज्ञा घेतली.
सर्व सभासदांना व विद्यार्थींना पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष सीए संतोष संचेती यांनी शपथ दिली. या कार्यक्रमास शाखेचे अध्यक्ष सीए संतोष संचेती, उपाध्यक्षा सीए सिमरन लिलवानी, सचिव सीए पंकज पाटणी तसेच सीए विजयकुमार बामणे, सीए शैलेश बोरे, सीए सुहास गार्डि आणि १०० पेक्षा जास्त विध्यार्थी उपस्थित होते.
तसेच शाखेचा वतीने वारकऱ्यांना वेदना निवारक मलम चे वाटप करण्यात आले. सीए विद्यार्थ्यांनी जकात नका परिसरातून सीए दिंडी काढली.















