न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेवून चोरी करणा-या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. अर्जुन शेषराव शिंदे (वय १८ रा. इंदिरानगर ता. पाथरी, जि. परभणी), सचिन मच्छिद्र पवार (वय ३८, रा. आष्टा फाटा, ता. आष्टा, जि. अहमदनगर), राजाराम साहेबराव शिंदे (रा. सुमित्रानगर, ता. माळशिरस जि. सोलापुर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
सोमवारी (दि. २४) रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू येथून लाखो वारक-यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी गर्दीचा फायदा घेत वारक-यांचे मोबाईल, दागिने व पैसे चोरणा-या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.











