न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एस. एस. सी. बोर्ड परीक्षा २०१९ मध्ये चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाने उत्तुंग यश प्राप्त केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. विद्यालयाला नेत्रदीपक यश मिळाले असून, विद्यालयाचा एकूण निकाल १०० % लागला आहे. या परीक्षेस एकूण २५७ विद्यार्थी बसले होते. यात ६७ विद्यार्थ्यांना ९० ते ९६. ८० टक्के गुण मिळाले आहेत. या निकालात विशेष बाब म्हणजे दुवितीय व तृतीय श्रेणीत एकही विद्यार्थी आलेला नाही.
विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक वाढ होण्याच्या दृष्टीने संस्थेने सुसज्ज आणि आधुनिक गणित प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, इंग्रजी विषयाची प्रयोगशाळा, भूगोल प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीस चालना देणारे अत्याधुनिक सायन्स सेंटर स्वतंत्ररित्या निर्माण करून दिले. त्यामुळेच विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत पुरेपूर उपयोग झाल्याच्या प्रतिक्रिया आणि विद्यार्थी व पालकांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.
विद्यालयातील यशाचे मानकरी
चि. प्रणव रामचंद्र इंदौरे ९६ .८०% , कु. गौरी बालाजी पाटील ९६.०० %, कु. अक्षदा ज्ञानेश्वर गाडगे ९५ . ८० %, कु. ईशा गोरक्ष खेडकर ९३.०० %, चि. अंकित अशोक काटकर ९३.०० %, कु. साक्षी जगदीश मुळे ९२. ८० %, चि. निरंजन बाळासाहेब काळे ९२. ८०%, मेघना मंगेश काजळक ९५. ६०%, चि. सुरज संतोष चौधरी ९२.६० %, कु. स्वाती रामदास टाव्हरे ९५.५० %, कु. नेहा प्रवीण गुंजाळ ९२. ६०% , चि. अथर्व सुरेश मेहेर ९५. ४० %, कु. साक्षी अशोक पांचाळ ९२.६०% , कु. मंजुषा संजय कुटे ९५.००%, कु. नेहा अनिल मोहळकर ९२.४०%, कु. गायत्री विजय तावडे ९२.४० %, कु. ऋचा सुहास कुलकर्णी ९४.८०%, कु. साहिल जितेन्द्र जाधव ९२.४० %, कु. नम्रता देविदास दुरगुडे ९४.८० %, चि. प्रणव विलास जव्हेरी ९२.४० %, कु. वैष्णवी आप्पा महानवर ९४.८० %, चि. आकाश दशरथ लोकरे ९२.०० %, चि. निलेश सुरेश कुदळे ९४.६० %, कु. कांचन दशरथ पवार ९२.०० %, चि. कन्हैय्या सुनील पोळ ९४.६० %, कु. अक्षदा राजेंद्र लंघे ९२.०० %, चि. श्रीवरद किशोर नंदा ९४.४० %, कु. प्राची प्रदीप अनपट ९४.४० %, चि. हर्शल शरद पटेल ९४.२० %, कु. श्रुती संभाजी सावंत ९४.०० %, चि. अथर्व कैलास रसाळ ९४.०० %, कु. पूनन दत्तात्रय जाधव ९४.०० %, कु. श्रेया प्रकाश पाटील ९४.०० %, कु. प्रणाली हनुमान खाटेकर ९४.०० %, कु. रसिका रमेश जाधव -९४.०० %, चि. नागेश अनिल फुलारे ९३. ८०% , चि. ओंकार संभाजी शिंदे ९३.८०%, कु. मनस्वी महादेव चव्हाण ९३.६०%, कु. गायत्री पांडुरंग मुळे ९३.४०%, कु. प्रतिज्ञा संजय स्वामी ९३.२०%, कु. प्रतीक्षा नारायण लबडे ९३.२० %, चि. पारस स्वरुपकुमार धोंगडे ९३.२० %, जया बाळासाहेब टैंगळे ९३.२०%, कु. सायली किरण भन्दुरे ९३.०० %, कु. साक्षी काळूराम पवार ९१.८० % व आदी विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले.
बोर्ड परीक्षेतील या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांनी सर्व यशस्वी विद्याथ्यांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव व संचालक विजय जाधव सर्व यशस्वी विदयार्थ्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुख्याध्यापक बाळाराम पाटील, उप-मुख्याध्यापक किसन आहिरे आदी उपस्थित होते.











