न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड सलमानी जमात व महाराष्ट्र न्हावी मंडळ, संतसेना महाराज पालखी सेवा सोहळा यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डीतील गुड लक हेअर कटिंग सलून समोर वारकऱ्यांची हजामत सेवा करण्यात आली.
यावेळी संघटनांच्या वतीने वारकऱ्यांची दाढ़ी व केशकर्तन करण्यात आले. तसेच, त्यांच्यासाठी जेवणाची सोयही करण्यात आली होती. या प्रसंगी जनाधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख, सलमानी जमात संघटना अध्यक्ष नसीम शेख, महाराष्ट्र न्हावी संघटना अध्यक्ष रंगनाथ पंडित, संत सेना अध्यक्ष श्रीमान कारले व आदींच्या सहभागाने पालखी सोहळ्यात सामील वारकऱ्यांची सेवा बजाविली.















