न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात होता. आज पहाटेच पालखीने आपला मुक्काम पुण्याच्या दिशेने हलवला. पालखी सोहळ्यात सामील वारकऱ्यांना लांबचा पल्ला गाठायचा असल्याने शहरातील दानशुरांनी आप-आपल्या परीने त्यांना मदत केली.
यावेळी नगरसेवक शैलेश मोरे यांनीही मागे न राहता वारीतील वारकऱ्यांची तहान भागविण्यासाठी एम्पायर इस्टेट समोरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. यावेळी कार्यकर्ते व आसपासचे नागरिकांनीही नगरसेवक मोरे यांच्या उपक्रमात सहभागी होऊन वारकऱ्यांची सेवा केली.















