- उत्कर्ष क्लासेसचा ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०१९’ उत्साहात संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- गेल्या २५ वर्षांत उत्कर्ष क्लासेसचा चढता आलेख हेच, उत्कर्ष क्लासेसच्या यशाच्या गुणवत्तेचे प्रतिक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी क्लासेसच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले जातात. त्यांचा बौद्धिक पातळीवरील विकास साधने, पुस्तकी अवलोकन करण्यास शिकवीणे एवढ्यावरच न थांबता, त्यांच्यात स्पर्धात्मक वाढीसाठी पुढील आव्हानांना कसे सामोरे जावे? याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे काम उत्कर्ष गेल्या २५ वर्षांपासून या माध्यमातून करीत आलेला आहे, असे प्रतिपादन उत्कर्ष क्लासेसचे संचालक प्रा. सतीश अनारसे यांनी केले.
प्रा. सतीश अनारसे संचलित उत्कर्ष क्लासेसचा ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०१९’ गुरुवार (दि. २० जून) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाला. याप्रसंगी प्रास्ताविक करताना प्रा. अनारसे बोलत होते. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या पिंपरी चिंचवड महापालिका नगरसदस्या आशा धायगुडे, प्रा. सतीश अनारसे, प्रा. विलास वाळके, प्रा. संतोष पाचपुते, विद्यार्थी, शिक्षक व पालक आदी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
नगरसदस्या आशा धायगुडे यांनी क्लासेसच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ्या दिल्या. क्लासचा आकाश चव्हाण हा विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र ठरला असून, त्याचा एआयआर रेन्किंग ५४१ असा आहे. त्याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच क्लासची विद्यार्थिनी करिश्मा नायर हिला बोर्ड परीक्षेत ९५.७० टक्के गुण मिळाले असून ती पिंपरी चिंचवडमध्ये प्रथम आली आहे. तिला गणित विषयात १०० गुण मिळाले आहेत. सीईटी परीक्षेत तिचा स्कोर ९९.७९ पेर्सेनटाइल आहे. क्लासच्या ९ विद्यार्थ्यांनी ९८ टक्क्यांपेक्षा अधिक तर, २३ विद्यार्थ्यांनी ९२ टक्के गुण मिळवित विशेष प्राविण्य मिळवले आहे. दहावीत हिमानी जोशी या विद्यार्थिनीने ९६ टक्के गुण मिळवीत वर्गात पहिली येण्याचा मान मिळविला. क्लासेसच्या २४ विद्यार्थांना ९० टक्क्यांपेक्ष जास्त गुण मिळालेले आहेत. दहावी व बारावीतील अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व मानपत्रक देऊन क्लासच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. विलास वाळके व प्रा. संतोष पाचपुते यांनीही आपले मनोगतं व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा सिलंम यांनी तर, आभार पाटील सर यांनी मानले.


















