न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- महिला आणि त्यांच्या भावाची बायको असे दोघीजणी मिळून मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात होत्या. त्या विठ्ठलनगर येथील दोस्ती बेकरीसमोर आल्या असता विक्की आणि अंगद यांनी त्यांना पाहून शिवीगाळ केली. याचा जाब विचरण्यासाठी महिला आरोपींकडे गेल्या असता ‘तुम्हाला कापूनच टाकतो’ अशी धमकी दिली.
तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करून ‘जर कोणी मधे आले तर त्याला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून परिसरात दहशत पसरवली. काही वेळेत त्या ठिकाणी पोलीस आले. पोलीस आल्यानंतर विक्कीची पत्नी सविता हिने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून हाताने मारहाण करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
विक्की महेश राठी (वय २५), सविता विक्की राठी (वय २२) आणि अंगद कांबळे (वय २६, सर्व रा. नेहरूनगर पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २१ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.











