न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या वर्तवणूकीमुळे महापालिकेची प्रशासकीय आचारसंहिता मोडीत निघत, महापालिकेच्या आजवरच्या प्रशासकीय कारभाराला बट्टा लागलेला आहे.
नुकतेच त्यांनी प्रशासकीय आचारसंहिता मोडीत शहर भाजपच्या कार्यालयात जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी तासभर चर्चा केली. याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यालयाला ”भाजप प्रवक्ते” असा नामफलक लावला आहे.
कालच्या कृतीने आयुक्त हे सत्तारुढ भारतीय जनता पक्षाचे घरगडी, दलाल, प्रवक्ते म्हणून काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भ्रष्ट आयुक्त आहेत. त्यांच्या या कृतीचा या माध्यमातून निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे, राहुल भोसले, जावेद शेख, विक्रांत लांडे, पंकज भालेकर ,विनोद नढे, राजु बनसोडे, प्रज्ञा खानोलकर यांनी सांगितले.











