न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- तब्बल पाच वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून एका इसमाने महिलेसोबत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. तसेच धमकावून आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत ४० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी राजेंद्र पर्वत ठाकरे (वय ५२, रा. शिवदत्तनगर, सायकर चाळ, नवमहाराष्ट्र शाळेसमोर, पिंपरीगाव) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
महिलेच्या कुटुंबियांना सांगण्याची धमकी देऊन तिच्या बँकेतील एफडीवर ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच २० तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. ही घटना २०१३ ते २०१८ या कालावधीत पिंपरी गावात घडली. या प्रकरणी पीडित ४० वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २५) रोजी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र याला अटक केली आहे.











