न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश, सचिन कळसाईत, शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या बद्दल माहिती दिली. तत्कालीन मागास, मुलभूत हक्क आणि अधिकारांपासून वंचित असलेल्या धर्मव्यवस्थेने अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या सर्व समूहांना त्यांनी राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. २६ जूलै १९०२ साली ५०% आरक्षणाची संरचना मांडून ती लागू केली. ते आरक्षणाचे जनक ठरले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गेवारे आणि प्रणाली मगर यांनी केले व आभार रोशनी गुप्ता यांनी केले.


















