न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- साईनाथ बाल मंदिरात ‘पालकांची कार्यशाळा’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांनी हस्त व्यवसाय, मुक्त व्यवसाय, चित्र रंगविणे, छापकाम यासारखी कामे केली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. रा. र. बेलसरे, खजिनदार प्रसाद गणपुले, सुनिता कुलकर्णी, मुख्याध्यापिका निशा बेलसरे, रेवती नाईक, प्रज्ञा पाठक, मानसी कुंभार, शितल कुलकर्णी, प्रज्ञा जोशी, योगिता देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रा. बेलसरे म्हणाले, शाळेतील तीन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांच्या आनंददायी शिक्षणाची सुरुवात बालक मंदिरात होती. तसेच, शाळेमध्ये दरवर्षी पालकांसाठी कार्यशाळा भरविण्यात येते. कार्यशाळेत काम करताना आलेल्या अनुभवामुळे पालक मुलांच्या वयाचा विचार करुन योग्य अपेक्षा बाळगतील. तसेच, या कार्यशाळेमुळे पालकांना शाळेतील प्रत्येक विषयांचे ज्ञान मिळते. घरामध्ये रोजच्या व्यवहारात उपलब्ध असणा-या साहित्यांच्या हाताळणीतून बालकांचे व्यक्तिमत्व खुलत जाते. याचबरोबर, पालकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता पाहून काम सांगावे.
या कार्यशाळेत पालकांनी तीस मिनीटात केलेल्या कामाचे परिक्षण करुन स्नेहल कराळे व ओंकार फणसळकर या पालकांनी प्रथम क्रमांक पटकविला. या कार्यशाळेत ८० पालकांनी सहभाग घेतला होता.











