न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि क्विंस टाउन हाऊसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कै. विजय मानकचंद लुनिया यांच्या स्मृतिदिनानिमीत्त क्वीन्स टाऊन क्लब हाउस येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. १२५ जणानी रक्तदान केले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पो उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पो आयुक्त आर आर पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक (सायबर) विवेक मुगळीकर,
क्वीन्स टाऊन सोसायटीचे अध्यक्ष सुजीत पाटील, सचिव शिरीष पोरेड्डी, रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, मावळते अध्यक्ष मल्लीनाथ कलशेट्टी, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स आसोशिएशनचे अध्यक्ष डॅा. संजीव दात्ये, रोटरी क्लब चिंचवडचे सचिव प्रवीण गुणावरे, सहसचिव यतीश भट, संजय खानोलकर, डॅा. विजय सातव, अभिजीत लूनीया व सोसायटी मधील सर्व पदाधिकारी व जेष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वायसीएम रक्त पेढीच्या टीमने नियोजन केले व १२५ रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या
सूत्रसंचालन सुरेश गारगोटे यांनी तर, आभार बाळकृष्ण खंडागळे यांनी मानले.















