न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी.
एनएसएस युनिटच्या मदतीने “संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये” डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेज आकुर्डी पुणे यांनी अभिनव उपक्रम राबवला. महाराष्ट्र पोलीस हे अहोरात्र वारकऱ्यांच्या सेवेत असतात. त्यांचे हे मौल्यवान योगदान लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विद्यार्थी वर्गानी औषध वाटप करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला.
प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व विद्यार्थीवृंदानी, पोलीस वर्गाला गरजू औषधयांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच दिलेल्या औषधाचा कसा वापर करावा याची माहिती देण्यात आली. ह्या उपक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. वारकऱ्यांची सेवा करण्याच्या परंपरेचा एक भाग म्हणून डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजने खारीचा वाटा उचलला.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. मुकेश मोहिते व डॉ शुभांगी दासवाडकर यांनी केले.


















