न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- प्रियंकाचा भाऊ आणि आरोपी यांच्यात जमिनीवरून वाद सुरु होता. त्यातून आरोपींनी बुधवारी दुपारी प्रियंका यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या भावाला बाहेर बोलावून घेतले. घरासमोर प्रियंकाच्या भावाला आरोपींनी बेदम मारहाण केली.
ही भांडणे सोडवण्यासाठी प्रियंका गेल्या असता त्यांनाही आरोपींनी भिंतीवर ढकलून दिले. यात त्यांच्या हाताला, पायाला व पाठीला मार लागला. आरोपींनी भांडणात प्रियंका यांचा मोबाईल फोन फोडला. ही घटना बुधवारी (दि. २६) रोजी दुपारी दीडच्या सुमारास वडमुखवाडी येथे घडली.
शंकर तापकीर, चंद्रकांत तापकीर, अशोक तापकीर, तुषार तापकीर, राजाराम तापकीर, सुदाम तापकीर (सर्व रा. वडमुखवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रियंका भाऊसाहेब तापकीर (वय २४) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.













