न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर व मावळ परिसरातील सर्वच भागात शुक्रवारी (दि. २८) रोजी जोरदार पाऊस झाला. बुधवार (दि. २७) रोजी पासूनच पावसाने धो- धो करीत दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने मावळातील शेतक-यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शुक्रवारी दिवसभर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात दमदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जागोजागी पाणी साचले होते. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी गटारे तुंबल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.
मावळात तसेच मुंबई-पुणे महामार्गावर काही ठिकाणी दरड कोसळली तर, काही ठिकाणच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. मावळातील पवना धरणातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काही दिवस सतत पावसाची संततधार सुरु राहिल्यास धरणाची पातळी वाढण्यास मदत होईल.











