न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी भाजप कार्यालयात गेलो होतो. तेथे ५ ते १० मिनिटे थांबलो, त्यात गैर काय? असा सवाल पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्यावरील सर्वच स्थरातून केलेल्या टीकाकारांना केला आहे.
कार्यालयात कमळाचे चित्र असलेल्या कपातील चहा मी घेतला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी गुरुवारी (दि. २७) रोजी पत्रकार परिषदेत दिले. आयुक्तांनी प्रोटोकॉल तोडून राजकीय पक्षाच्या कार्यालयास भेट दिल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच्या नामफलकावर भाजप प्रवक्ते असे स्टिकर चिटकवून निषेध केला. काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
याबाबत आयुक्त म्हणाले की, पालकमंत्री पाटील हे प्रथमच पिपरी चिचवड शहरात आले होते. त्याचे शहरात इतरत्र कोठेही कार्यक्रम नव्हते. म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथे गेलो.











