न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारे मिलिंद कांबळे यांना मांडीच्या खुब्याचा त्रास अनेक दिवसांपासून होता. डॉक्टरांनी त्या भागाची शस्त्रक्रिया करून नवीन अवयव बसविण्यास सांगितले. परंतु, त्यासाठी पाच लाखांपेक्षा अधिक खर्च सांगितल्याने, शस्त्रक्रिया रखडली होती.
या दरम्यान मिलिंद कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांची भेट घेतली. त्यांनी सर्वोतोपरी मदत केली. त्यामुळे कांबळे यांच्या मांडीच्या खुब्याची शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या व्याधीतून मुक्त झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.
परिस्थिती नाजूक आणि बेताची असल्यामुळे मांडीच्या खुब्याची शस्त्रक्रिया रखडली असल्याचे कांबळे यांनी मला सांगितले. त्यामुळे मी वेळ न दवडता लागलीच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी शासनदरबारी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री सहायता निधीही ताबडतोब मंजूर झाल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी त्यांना मदत मिळवुन दिली. त्यामुळे कांबळे यांच्या मांडीच्या खुब्याची शस्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
– अमित गोरखे अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ















