न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- सध्या नवीन पिढीला शव वाहून नेहण्यासाठी बांबूची शिडी बांधता येत नाही. तसेच त्यासाठी साधारण ५०० ते ७०० रुपये खर्चही येतो.
समाजातील ही समस्या लक्षात घेऊन मुरलीधर सारडा ह्यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय द्वारकदास श्रीकिसन सारडा ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महेश सांस्कृतिक मंडळातर्फे, निगडी येथील स्मशान भूमीमध्ये सर्व धर्मियांसाठी स्टीलच्या शिडीचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
या उपक्रमास नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, महेश सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष गोविंद दरगड, सचिव अशोक जाखेटे, सतीश सोमाणी, शिरीष मनुधने, अजय लढ्ढा, सुशील सारडा, युवा एवं महिला समिती कार्यकर्ते आदी उपस्थित होते.















