न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम विभाग आणि वायसीएमएच विभागाच्या समन्वय व सुसूत्रीकरणासाठी मडिगेरी यांनी आज शनिवारी (दि. २९) रोजी बैठक घेतली.
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वासीएमएचचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
वायसीएमएच, महापालिका रुग्णालयात होणा-या अवघड आणि दुर्मिळ शस्त्रक्रियांची दर आठवड्याला प्रसिद्धी देण्यात यावी. रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था, डॉक्टर, कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरुपी पोलीस कर्मचारी नेमण्यासाठी पोलिसांशी पत्रव्यवहार करावा. डॉक्टरांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी कायमस्वरुपी पोलीस चौकीची मागणी गृह मंत्रालयाकडे करण्यात यावी, रुग्णालयात येणा-या रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना सौजन्याची वागणूक देण्यात यावी. रुग्णाला भेटण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी वेळ निश्चित करावी. रुग्णाजवळ पूर्णवेळ राहणा-यांसाठी ‘ग्रीन कार्ड’ व रुग्णांना भेटण्यासाठी येणा-यांना ‘पींक कार्ड’ची व्यवस्था करण्यात यावी. दर १५ दिवसांनी पहिल्या व तिस-या शनिवारी रुग्णालयाच्या अडीअडचणी व सुधारणा संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे, असे मडिगेरी म्हणाले















