न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- शौर्य प्रतिष्ठान व प्रबोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इक्रा इंग्लिश मिडीयम येथे शनिवार (दि. २९) रोजी सकाळी ११.०० वाजता १०-१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
दापोडीतील इक्रा इंग्लिश मिडीयम स्कूलने १० वी मध्ये सलग पाच वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. निकालाची परंपरा कायम राखण्यात परिश्रम घेतलेले इक्रा संस्था प्रमुख उमेर गाजी, सलीम शेख, प्राचार्या मदिना शेख, शभा शेख, अंजुम इमामदार, मुसरत शेख, कायन्त खान, सुरेख पाटोळे, शोभा जाधव, हवाईन शेख यांचा खा. अमर साबळे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व भेट देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच राज्यसभा खासदार अमर साबळे यांची प्रतोतपदी, आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अध्यक्षपदी अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले यांचा शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल वाळुंजकर व सर्व सदस्यांच्या वतीने विशेष सम्मानचिन्ह, शाल व वृक्ष भेट देऊन गौरविण्यात आला.
यावेळी मा. नगरसेवक दत्ता खाडे, नगरसेवक माऊली थोरात, संजय कणसे, सरचिटणीस प्रकाश जवळकर, सागर फुगे, गणेश बगाडे, पप्पा बाराथे, आबा कोळेकर, उमर गाझी, सलीम शेख, नाना लांडगे, सोपान भडाळे, प्रदीप वाळुंजकर, एकनाथ बहिरट आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमीर शेख, शुभम सिल्व्हे, धर्मेंद्र क्षीरसागर, राजू कानाडे, सुधीर चव्हाण, सतीश ढोकले, रामदास भांडे, सागर जिंजे, विशाल सातपुते, गोरख ब्राम्हणे, अरविंद असुतकर आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल सातपुते यांनी, स्वागत सलीम शेख यांनी तर, सूत्रसंचलन:गोरख ब्राह्मणे व आभार अमिरभाई शेख यांनी मानले.















