न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरुन झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा तर, पाठीमागून दुचाकीची धडक बसून एकाचा मृत्यू झाला आहे.
१७ फेब्रूवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अभिजीत त्यांच्या दुचाकीवरुन जात होते. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात जात असताना थरमॅक्स चौकाजवळ त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अभिजीत यांचा मृत्यू झाला.
दुस-या घटनेत, किरण २२ एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ज्यूपिटर मोपेड दुचाकीवरून जात होते. भरधाव वेगात जात असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते थरमॅक्स चौकात पडले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या किरण यांचा मृत्यू झाला.
तिसऱ्या घटना शुक्रवार (दि. २८) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वाकड येथील काळा खडक झोपडपट्टीसमोर रात्री साडेआठच्या सुमारास सविता काळाखडक झोपडपट्टीसमोरील सार्वजनिक रस्त्याने पायी जात होत्या. त्या रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या शुभमने त्यांना धडक दिली. यामध्ये सविता गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सविता सिद्धाराम गायकवाड (वय ३५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सविता यांचे दीर लखप्पा तुकाराम गायकवाड (वय ३५ रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शुभम विजय बाकडे (वय २३, रा. वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


















