न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- पीडित मुलीच्या घरी एक पाळीव मांजर आहे. ती मांजर एके दिवशी घराबाहेर गेली. तिला आणण्यासाठी पीडित मुलगी राहत्या ईमारतीच्या दुस-या मजल्यावर गेली. मुलगी मांजराला आवाज देत होती. तिथे राहणा-या आरोपीने तिचे तोंड दाबून जबरदस्तीने घरात ओढून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने त्याचा व्हिडिओ तयार केला. मुलीने याबाबत कोणाला सांगितले, तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याचाच फायदा घेऊन आरोपीने पीडित मुलीवर पुन्हा एकदा अत्याचार केला.
याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१८ आणि जानेवारी २०१९ या कालावधित झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.















