- “वात्सल्य” संस्थेस ४०० किलो धान्य व जीवनावश्यक वस्तु भेट
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- ‘वात्सल्य’ देहु-येलवाडी येथे जैन सोशल डायमंड अँक्टिव्हीटी ग्रुप व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिति यांच्या संयुक्त विद्यमाने “एक मुट्ठी अनाज” या सामाजिक उपक्रमाद्वारे पिंपरी चिंचवड़ शहरात जमा केलेले ४०० किलो धान्य त्यामध्ये गहु, तांदूळ, साखर, १५ किलो शुद्ध गोड़े तेल, कडधान्य, हरबरा आणि मुगडाळ संस्थेचे संचालक यांचेकडे सुपुर्त करण्यात आले.
या प्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा समिति अध्यक्ष विजय पाटील, अर्चना घाळी दाभोळकर जैन सोशल अँक्टिव्हीटी ग्रुप चे संतोष छाजेड़, विजय मुनोत,विजय नहार, राजेन्द्र कटारिया,पारस लोढ़ीया, बाबासाहेब घाळी,कुमारी खुशी लोढ़ीया संस्थेचे कार्यवाह उपस्थित होते.
पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहरातील वंचित घटकांना जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिति व जैन सोशल डायमंड ग्रुप च्या वतीने शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम सुरु केले आहेत त्या अंतर्गत जमा झालेले धान्य विविध गरजू संस्थाना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी वाटले जाते.या महिन्यामध्ये एम्पायर एस्टेट सोसायटी चिंचवड़ मधील जयादेवी महिला मंडळ तसेच एचडीएफसी कॉलनी महिला मंडळाने विशेष योगदान दिले.
देहु येलवाडी येथील वात्सल्य संस्थेत सध्या १८ दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लोकमदतीचाच संस्थेला मुख्य आधार आहे. सदयस्थितित संस्थेला खाद्यसामुग्रीची नितांत आवश्यकता होती. त्यानुसार दोनही संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना धान्याची मदत देण्यात आली.















